वय लहान, कर्तृत्त्व महान

    डॉ. निलिमा यांचे सुरवातीचे शिक्षण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत झाले. परिस्थिती नसताना स्वबळावर शिकायचे ही जिद्द होती. त्या जोरावर त्या शिकत गेल्या. इच्छा आणि बुद्धिमत्ता असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. इच्छाशक्ती असेल, तर चांगली माणसे मिळत जातात आणि सगळे साध्य होत जाते. सध्या पीएचडीसाठी संशोधन सुरू असले, तरीही डॉ. निलिमा त्याच इच्छाशक्ती आणि जिद्दीने शिकताहेत. डॉक्टर व्हायची निलिमा यांची स्वतःची इच्छा होती. त्यासाठी आजीआजोबांकडून प्रोत्साहन मिळत होते. त्याच आधारावर बीएएमएस पूर्ण केले आणि पुढे प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. समीर जमदग्नी हे त्यांचे आयुर्वेदाचे गुरु. दुसरे एक वडिलधारे डॉ. सदानंद सरदेशमुख. त्यांचे कॅन्सरचे हॉस्पिटल होते. तिथे ईएनटीशी संबंधित कॅन्सरचे निदान करण्याचे काम त्यांनी दिले होते. त्यासाठी प्रत्येक बुधवारी निलिमा त्यांच्या हॉस्पिटलला जात असत. त्याचे त्यांना पाचशे रूपये मिळत. अशा रितीने त्यांच्याशी डॉ. निलिमा यांची नाळ जोडली गेली. सर्जिकलला डॉ. अविनाश वाचासुंदर हे गुरू लाभले. डॉ. जमदग्नी तर त्यांना आरंभशूर म्हणतात.
    डॉ. निलिमा यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. 2000 साली त्यांना रस्त्यावर मोठा अपघात झाला. त्यामुळे 21 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लाग



Find a Location

  • Location

CONTACT US
Kayayurved
Suvidha Smita Apartment, Tilak Smarak To Perugate Police Station Lane, Sadashiv Peth - 411030
02024481699
Leave A Message